What are Benefits of Digital Marketing

आपला व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे मार्केटिंग करावे लागते. इंटरनेटचे युग सुरु होण्याआधी वृत्तपत्रात जाहिरात देणे, पोस्टर किंवा पाम्पलेट छापून सर्वांना वितरित करणे, होर्डिंग लावणे इत्यादी प्रकारे व्यवसायाची जाहिरात केली जायची. जेव्हापासून इंटरनेटचे युग सुरु झाले तेव्हापासून मार्केटिंग मध्ये सुद्धा नवीन क्रांती घडून आली. खूप सारी डिजिटल माध्यमे उपलब्ध झाली. मोबाईल तर प्रत्येकाकडे आला. या सगळ्या डिजिटल माध्यमांचा आणि इंटरनेटचा वापर करून केलेले मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय. यामध्ये प्रामुख्याने वेबसाईट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, डिजिटल मीडिया यांचा समावेश होतो.